तब्बल! ११ लाख ५० हजार रुपये संजय राऊत यांच्या घरातून जप्त. या रखमेचं हिशोब लागला आहे - सूत्र

मुंबई :  शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी कार्यालयात चौकशी झाली. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यात येत होती. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती आहे. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीनं काल सकाळी संजय राऊत यांच्या घरी छापा टाकत संजय राऊत यांच्या घरातून तबल्ल  ११ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



ईडी मला अटक करणार, मी अटक व्हायला चाललोय, मरेन पण ठाकरेंची साथ सोडणार नाही : संजय राऊत (शिवसेना नेते)


११ लाख ५० हजार एवढी रक्कम संजय राऊतांच्या घरातून जप्त - 

३१ जुलैच्या सकाळी ईडीनं संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला. संजय राऊत यांच्या घरातून ईडीनं काही कागदपत्रं जप्त केली आहे. राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपये जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. त्या नंतर संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या ११ लाख ५० हजार रुपयांचा हिशोब लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १० लाख रुपयांच्या रकमेवर १० लाख रुपये हे पक्षाचे आहेत. दीड लाख रुपये हे घराच्या दुरुस्तीसाठीचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १० लाख रुपयांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीनं ११ लाख ५० हजार रुपये चौकशीसाठी नेण्यात आले आहेत.


संजय राऊतांची  पत्रा चाळ प्रकरणी ईडीची चौकशी सुरु 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडी ३१ जुलैरोजी सकाळी दाखल झाली. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवत आहेत. संजय राऊत यांच्या घरातून पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नसल्याची माहिती देखील संजय राऊत यांच्या वकिलांनी दिली आहे.

शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं काही करण्यात येत आहेत. हे सगळं दमनचक्र सुरु आहे, असा आरोप केला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं वक्तव्य  संजय राऊत यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या