मुंबई: मराठी सिनेश्रुष्टी मध्ये धक्कादायक बातमी आज मंगळवार ०९ ऑगस्ट रोजी होत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्रे प्रदीप पटर्वथ (Pradeep Patwardhan Died) यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी आलेली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या सर्वत्र  आपला ठसा उमटवणारे  प्रदीप पटर्वथ यांनी ०९ ऑगस्ट रोजीचा शेवटचा श्वास घेतला. मुंबईमधील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अशी प्राथमिक माहिती येत आहे. त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहते देखील शोकाकुल मध्ये आहेत. अनेकांनी  सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Marathi Actor Pradeep Patwardhan Dies


अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी त्याच्या वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  'मोरूची मावशी' या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात आहे. या नाटकातील 'भैया पाटील' ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडीची होती. भरत जाधव, विजय विजय पाटील, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकार सोबत रंगभूमी गाजवली आहे. 'नवरा माझा नवसाचा', 'लावू का लाथ' या चित्रपटातील त्यांच्या रंजक भूमिका अनेकांना हसायला भाग पाडते. 

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म १ जानेवारी १९७० साली होता. हे एक मराठी अभिनेते होते. प्रदीप पटवर्धन यांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपली  भूमिका सुंदर रित्या रंगवली. 2019 ला प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार (Akhil Bharatiya Natya Parishad Award) मिळाला होता.  त्यांनी केलेली  "मोरूची मावशी" या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. मोरूची मावशी" या नाटकातील भूमिकेनं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं. त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच आपलं स्थान निर्माण केलं होतं. 

मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.

त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत ट्वीटरवरती पोस्ट शेअर केली आहे. “मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.