पुढील २५ वर्षांत भारताला विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना पंचप्राणांचा मंत्र दिला. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त (Amrit Mahotsav Independence Day) लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला आणि महिलांचा सन्मान करण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे. मोदी यांना सलग नवव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला. मोदी यांचे भाषण ८२ मिनिटे चालले. गतवर्षी त्यांचे भाषण १८८ मिनिटे चालले होते. २०१४ साली जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, त्यावेळी त्यांचे भाषण ६५ मिनिटे चालले होते. केवळ एकदाच, २०१७ साली मोदी यांचे भाषण एक तासापेक्षा कमी काळ झाले होते. त्यावेळी ते ५६ मिनिटे बोलले होते. (Amrit Mahotsav Independence Day)

Amrit Mahotsav Independence Day
Prime Minister Narendra Modi

'भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाच्या विकासात अडथळे ठरणारी दोन मोठी आव्हाने आहेत. ती केवळ राजकारणा पुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत. या दोन्ही दुष्प्रवृत्तींबाबत लोकांनी द्वेषभावना जागृत करावी आणि येत्या २५ वर्षांत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला यावे यासाठी 'पंचप्राणांवर लक्ष केंद्रित करावे,' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav Independence Day) पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांत देशाची वाटचाल कशी असायला हवी, याचा आराखडाच मांडला. विकसित राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांना मूठमाती द्यावी लागेल, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच विकासाच्या मार्गावर गतिमान प्रवास करायचा असेल पाच सूत्रे (पंचप्राण) देशवासीयांनी अवलंबायला हवीत, असेही पंतप्रधान म्हणाले.

विकसित भारतासाठी कटिबद्ध राहणे, कोणाच्या मनात गुलामीचा अंश असता कामा नये, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान, विविधतेत असलेल्या आपल्या एकतेची जपणूक आणि नागरिक म्हणून यात पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचाही समावेश आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही पंचसूत्री मोदी यांनी देशवासीयांना दिली. 

काय आहेत हि पंचसुत्रे: 

१) मोठा संकल्प, विकसित जिद्द घेऊन भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे.

२) शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका. मनात असलेला गुलामगिरीचा जराही अंश काढून टाकायचा आहे.

३) आपल्याला आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असायला हवा. कालबाह्य गोष्टी सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा आहे..

४) १३० कोटी देशवासीयांमध्ये एकता आणि एकजूट. कुणीही परके नाही, हा भाव. 

५) नागरिक म्हणून कर्तव्यपालन, पंतप्रधानही नागरिक, मुख्यमंत्रीही नागरिक. त्यांनाही कर्तव्य बंधनकारक.


या पाचही सूत्रांचा प्रामाणिकपणे अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित येऊन सांघिक पद्धतीने काम करायला हवे, असेही मोदी म्हणाले.