Ellora Caves: वेरूळच्या लेण्यांमध्ये बसवण्यात येणार हायड्रोलिक लिफ्ट (Hydraulic Lift); अशी लिफ्ट असलेलं देशातील पहिले जागतिक वारसा स्थळ.

महराष्ट्रातील औरंगाबादच्या वेरूळ येथे स्थित युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पाचव्या ते सहाव्या दशकातील वेरूळ लेणी (Ellora Caves) येथे हायड्रोलिक लिफ्ट (Hydraulic Lift) बसविण्यात येतील असं सांगण्यात त्यात आहे. सुमारे औरंगाबादपासून ३० ते ४० किमी अंतरावर असणाऱ्या वेरूळ येथे सातमाळा पर्वत रांगेत सुमारे पाचव्या ते सहाव्या दशकाच्या कालखंडातील एकूण ३४ कोरलेल्या लेणी आहेत. या वेरूळ लेणी येथे हायड्रोलिक लिफ्ट (Hydraulic Lift) बसवण्यात येणार आहे शी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.या परिसरात हिंदू, बौद्ध आणि जैन शिल्पे आहेत.

Ellora Caves


औरंगाबाद परिमंडळातील अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ मिलन कुमार चौले, म्हणाले -

‘एएसआय 500 मीटर अंतरावर पसरलेल्या वेरूळ लेण्यांना पर्यटकांसाठी अधिक अनुकूल बनवण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेत आहोत. या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याच्या किंवा ते पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहेत. मंदिर संकुलातील 34 लेण्यांपैकी 16 क्रमांकाची कैलास गुफा  लेणी अत्यंत महत्त्वाची आहे. कैलास गुफा हि  प्रसिद्ध लेणी असलेली जागा दोन मजली आहे. या लेणीमध्ये पर्यटकांना गुहेतून वर पायऱ्या चढून जावे लागते.


गुहेत व्हीलचेअरच्या सुरळीत हालचालीसाठी पायऱ्या आणि रॅम्प बनवण्यात आले आहेत. त्याच वेळी, एएसआयने संरचनेच्या दोन्ही बाजूंना लहान लिफ्ट्स (Hydraulic Lift) बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. येथे या लिफ्ट्स बसवण्यासाठी कोणतेही नवीन बांधकाम केले जाणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. येथे बसविण्यात येणारी यंत्रणा लहान असेल, ज्याचे क्षेत्रफळ 9 चौरस फूट असेल. यामध्ये व्हीलचेअर असलेली व्यक्ती पहिल्या मजल्यावर सहज जाऊ शकते. यामुळे एएसआय अंतर्गत वेरूळ हे देशातील पहिले जागतिक वारसा स्थळ बनणार आहे, जिथे लिफ्टची सुविधा असेल. 


उच्च अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली होती. वरून कैलास लेणीही पर्यटकांना पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कैलास लेणी ही डोंगरांनी वेढलेली रचना असून त्यासाठी वरच्या टेकडीवर एक मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या ठिकाणी हायड्रोलिक लिफ्ट्स (Hydraulic Lift) हि यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अधिका-याने सांगितले की एएसआय काही पेंटिंग्जसाठी प्रकाशयोजना बसवण्याचा आणि काही भागांवर संवर्धन करण्याचे काम करत आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या