Vegetables for diabetes Control : आरोग्यदायी आरोग्य सगळ्यांचं हवे असते आणि आपला आहार यामध्ये खूप महत्वाचा ठरतो, कारण आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावरती परीणाम होऊ शकतो. हेल्दी लाईफसाठी तुमचा आहार हा खूप महत्त्वपूर्ण असतो, कारण आहारामुळे तुमच्या साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. जर तुम्हाला मधुमेहाचा (diabetes) आजार झालेला असेल तर तुम्हाला हेल्दी डाएट घेणे गरजेचे आहे, जसे कि टाईप २ चा मधुमेह झालेल्या लोकांच्या आहारात फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिने, खनिजे यांचा समावेश असावा.
"ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात हिरव्या पालेभाज्या मधुमेहाच्या (Vegetables for diabetes) रुग्णांसाठी चांगल्या असल्याचे आढळून आले आहे. टाइप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करण्यात सुद्धा या पालेभाज्या मदत करत असतात. या जनरलच्या अनुशंगाने पालेभाज्या मधुमेहींसाठी खूप उपयुक्त आहेत आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याकरीता मदत करीत असतात."
हिरव्या पालेभाज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी:
पालक (Spinach):
पालक एक डायबिटीज फ्रेंडली भाजी आहे. पालक या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर चे प्रमाण असते जे शरीरातील साखरेची पातळी रोखण्यास मदत करते. पालक या हिरव्या पालेभाज्यातील लोह (iron) निरोगी रक्तप्रवाहासाठी आवश्यक आहे. पालकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि पॉलिफेनॉलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात हे घटक रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि त्यात कॅलरीजही कमी असतात. पालकमध्ये मॅग्नेशियमची चांगली मात्रा प्रदान करते ज्याच्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
काकडी (Cucumber):
मधुमेहींसाठी काकडी ही एक पालेभाज्यामधील एक सर्वोत्तम भाजी आहे ज्याची शिफारस अनेकजण करत असतात. काकडी हि तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करत असते आणि त्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटू शकते. काकडी बहुतेकदा हिरव्या सॅलडमध्ये समाविष्ट केली जातात. काकडी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी मेंटेन करण्यास मदत करते.
कोबी (Cabbage):
कोबीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा सकारात्मक परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. यात फायबर देखील प्रमाण असते जे मधुमेहामध्ये रक्त प्रवाह स्थिर करण्यास मदत करते. फायबर हे पचन प्रक्रियेचे नियमन करते आणि रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी वाढू न देण्यास मदत करत असते. आपण भाजी किंवा सॅलडमध्ये कोबीचा समावेश करू शकतो. स्वयंपाक करण्यापूर्वी कोबी स्वच्छ धुऊन घेणे आवश्यक असतात.
दोडका (Dodka):
दोडका हि एक पालेभाज्यां मध्ये लोकप्रिय भाजी आहे. ही भाजी कॅरोटीनॉइड संयुगाने (carotenoid compounds) भरलेली आहे. हे संयुगे हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतात आणि काही कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत देखील करू शकतात. या भाजीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात आणि ते कोलेस्ट्रॉलही देखील कमी करू शकतात. हे पचनास देखील मदत करते. दोडका हा पालेभाज्यामधील जीवनसत्त्वे अ आणि क चा एक उत्तम स्रोत आहे. दोडका या भाजीमुळे मॅग्नेशियम स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.
फ्लॉवर (Cauliflower):
फ्लॉवर ही भाजी फायबरने परिपूर्ण असते आणि तसेच आहारातील तृप्ती सुद्धा वाढवण्याचे काम करते. मधुमेह झालेल्या लोकांना हे अन्न पचायला जास्त वेळ लागतो. हे लवकर चयापचय होत नाही आणि म्हणूनच, रक्तातील साखरेची (Blood Sugar) पातळी वाढू देत नाही. त्यामुळे आहारात फ्लॉवर या पालेभाजीचा समावेश करावा.
0 टिप्पण्या