PM Modi: मोदींनी कधीच चहा विकला नाही, सख्ख्या भावाचा दावा
जेव्हापासून नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान (PM Narendar Modi) म्हणून निवडून आले तेव्हापासून आज पर्यंत नरेंद्र मोदीजी यांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एक चहावाला भारताचा पंतप्रधान झाला आणि आपली क्रेज सर्वत्र पसरवली. भारताचं नाही तर संपूर्ण जगात याची नोंद घेतली, भारतीय पंतप्रधान बनला एक चा वाला.
भारतातच नव्हे तर सर्वत्र चर्चेत असलेले चहावाले पंतप्रधान हे चहावाले नाहीत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केला आहे. प्रल्हाद मोदीजी हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे भाऊ आहेत, त्यांनी आपल्या भावच्याच सरकार विरुद्ध सडकून टीका करताना हा दावा केल्याची बातमी आली आहे.
prahlad modi stages dharna |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे नवी दिल्लीमधील जंतर मंतर वरील आंदोलनात सहभागी झालेले होते. अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या (Fair Price Shop) फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या जंतरमंतर वरील आंदोलनात ते सहभागी झाले होते. प्रल्हाद मोदी हे अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. नवी दिल्लीत जंतरमतर वरील आंदोलनामध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendar Modi) यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी आपल्या भावावरच सडकून टीका केली आहे. भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरती आक्षेप घेतला आहे. भाषणात बोलताना ते म्हणाले की, खरं तर मोदींना चहा विकणारा नाही तर चहा विकणाऱ्याचा मुलगा म्हणवल गेल पाहिजे . ही सर्व पत्रकरांची चूक आहे. आमच्या वडिलांनी पूर्ण आयुष्य चहा विकून आमच पाच भाऊ आणि बहिणीच पालनपोषण केलं. आपल्या इकडचे प्रेसवाले लिहतात चहावला, मोदींना चहावाल्याचा मुलगा म्हणा चहावला नाही". अश्या प्रकरच्या सडकवून टीका प्रल्हाद मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरती केली आणि या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत येत आहे.
प्रल्हाद मोदी आणि अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी झाले होते. फेडरेशनच्या मागण्यांचं निवेदन लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendar Modi) यांना दिलं जाणार आहे. प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे देखील एक रेशन दुकान चालवतात. जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा, माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं, उपाशी मरु का? असा सवालही त्यांनी आधी केला होता.
0 टिप्पण्या