थांबा! तुम्हीसुद्धा सोशल मीडियाचा अतिवापर करत असाल तर तुम्हाला 'फोमो' हा आजार होण्याची दाट शक्यता आहे। Fomo (Fear Of Missing Out)

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे येऊ शकत नैराश्य तज्ज्ञांचे निरीक्षण: 'फोमो' (FOMO) आजारात वाढ

आजकाल झोपेतून उठताच सर्वांना चटक लागते ती आपल्या मोबाईलची, मोबाईल घ्याचा अनं सोशल मीडियावर (social Media) जाऊन बातम्या पाहायच्या, लिंकडीन सारख्या करिअर अँपवर आपली वैयक्तिक माहिती नियमितपणे अपडेट करायची किंवा फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करयायचे. पण, ते बघून काही जणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते आणि यांमुळे बळावतो 'फोमो' (Fomo). दररोज सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये हा आजार सातत्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

Fear Of Missing Out

'फोमो' (Fomo) म्हणजे काय?

'फोमो' म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट (Fear Of Missing Out) हा आजार म्हणजे काही कारणांमुळे आपण मागे पडत असल्याची भावना व भीती निर्माण होणे. दररोज सोशल मीडिया (social Media)  वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दररोज सोशल मीडियाचा होणारा अतिवापर, त्यात लाइक्स, कॉमेंट आदींचा सतत पाठपुरावा करणे, दैनंदिन जीवनातील घडामोडींवर त्याचा परिणाम होणे म्हणजे या आजाराची काही लक्षणे आहेत.

'फोमो'ची कारणे कोणती?

हा आजार सध्या इंटरनेटच्या वाढत्या वेगा सारखा वाढत आहे. सतत कशाची ना कशाची चिंता भासत असते, हा 'फोमो'चा पहिला टप्पा आहे. तो वाढल्यावर व्यक्तीला नैराश्य जाणवते. आणि नंतर त्यातून व्यक्तिचे रूपांतर रुग्णामध्ये होते आणि नंतर 'फोमो'वर उपचार घ्याण्याची वेळ येते. लहान वयातील मुलांपासून अगदी प्रौढांपर्यंत कोणालाही 'फोमो' हा आजार होऊ शकतो, सोशल मीडियाचा 'रिच' वाढता पाहता तरुणाईत हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 'फोमो' हा मानसिक आजार दिसून येत असला, तरी त्याचा परिणाम हा थेट शरीरावरही होऊ शकतो आणि व्यक्तीचा आत्मविश्वास हळुहळु कमी होऊ शकतो. एकटेपणा वाटणे, गर्दीची भीती आणि स्वतःबद्दल तयार झालेला न्यूनगंड तसेच असमाधानी वृत्ती आणि आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी कमी असल्याची जाणीव होणे, हे 'फोमोचे' मुख्य कारण आहेत.


फोमो च्या आजारापासून वाचण्यासाठी हे उपाय करु शकता:

• सोशल मीडिया आणि इतर अॅपपासून ठरावीक वेळासाठी वापर करा.

• दररोज ध्यान, प्राणायाम आणि योगासनांचा सराव करा आणि शारीरिक व्यायाम प्रकारांवर भर द्या

• आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियाचा वापर करू नका

• सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी विविध उपक्रमांत सहभाग व्हावे.



" 'फोमो' (Fomo) हा सोशल मीडियामध्ये (social Media) रमणाऱ्यांमध्ये जास्त आढळतो. अशा व्यक्तींना आपले आयुष्य सोडून इतरांचेच आयुष्य सुंदर आहे, असे वाटत राहते. अनेकदा त्यांना आभासी आयुष्य कळत नाही. इतरांशी सतत बरोबरी करायची असते, पण ती गोष्ट आपल्याला आवडते की नाही, याचा त्यांना अंदाज नसतो. आपल्या बलस्थानांची, मर्यादांची जाणीव होणे, त्या समजून घेऊन 'आहे त्याचा' स्वीकार करायला शिकणे आदींद्वारे फोमोवर मात करता येते. - डॉ. शिल्पा तांबे, समुपदेशक"



"लोक व अनुभवांपासून मागे पडण्याची भीती म्हणजे 'फोमो.' हा आजार ७० टक्के लोकांमध्ये आढळतो आणि त्याचे प्रमाण हे। वाढतच आहे. यावर उपचार म्हणजे, सोशल मीडियाचा ठरवून एक दिवस उपवास करणे. इंटरनेटपासून एका अंतरावर राहणे. -श्रुती सोमण, मानसोपचार तज्ज्ञ"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या