Cwc 2022, Mirabai chanu: मीराबाई चानुने जिंकलं भारतासाठी सुवर्ण पदक

बर्मिंगघम : भारतासाठी पुन्हा एकदा खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मीराबाई चानूने (Mirabai Chanu) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (CWC 2022) भारताला पहिलं सुवर्णपदक पटकावून दिले.  चानूने महिला 49 किलो वजनी गटात ही सुवर्ण कमाई केली आहे. चानूने  एकूण 201 किलो वजन उचलत भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून भारतासाठी विक्रमही केला. टोकियो ऑलिम्पिक मधील रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम करून दाखवला आहे. (cwc 2022: weightlifter mirabai chanu wins gold Medal in womens 49 kg category)



मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये आपली विक्रमी कामगिरी तशीच कायम ठेवली आहे. तिने पहिल्या प्रयत्नात 109 किलो वजन तर दुसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलून दाखवले आहे. चानूला क्लीन अँड जर्कमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलायचे होते. परंतु या प्रयत्नात ती अयशस्वी ठरली. भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या भारतासाठी सुवर्णपदक घेऊन आली होती. 

मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 202 किलो वजन उचलून भारतासाठी रौप्यपदक जिंकून आणले होते. बर्मिंगहॅममध्ये मीराबाई तिच्या शेवटच्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलून ऑलिम्पिकचा टप्प्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिचा अंदाज चुकला.


एकाच दिवसात तीन तीन मेडल जिंकलं भारताने - 


 भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे भारताने एकाच दिवशी 3 मेडल जिंकून कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम राखलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सांगलीचा सुपुत्र सागर सदगर याने सिल्व्हर मेडल जिंकत भारतासाठी खात उघडलं, त्यानंतर गुरुराज पुजारी याने कांस्य पदक तर  मीराबाईने गोल्डन मेडल मिळवून पुन्हा एकदा भारताचे खेळामध्ये नाव कायम ठेवले आहे.Cwc 2022, Mirabai chanu: मीराबाई चानुने जिंकलं भारतासाठी सुवर्ण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या