आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय - अश्या तुफान शब्दांत दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे दमदार भाषण

गेल्या दोन वर्ष्यांपासून न केलेला हा दहींहडी उत्सव आज संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषात साजरा केला जात आहे. तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुंबईमध्ये तेवढ्याच जल्लोषात हा उस्तव साजरा होताना पाहायला मिळतोय. तसेच महाराष्ट्राच्या या राजधानी मध्ये अनेक राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या उत्सवामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे अनेक दिग्ग्ज नेतेदेखील आपली दहीहंडीला उपस्थिती दर्शवत आहेत. तर मुंबई येथील भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले "गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील". "तसेच सर्व सुविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय. छा-छान वाटतंय, असं मिश्किल भाष्यदेखील केलं". त्यावेळी दहीहंडीसाठी भाजपचे अनेक नेते त्याच्या सोबत उपस्थितीत होते.

devendra fadnavis speech in dahi handi 2022
Devendra Fadnavis speech in dahi handi 2022

भाषण दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले-

“आता आपले सरकार आहे. आपले सकार आल्यानंतरर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, की आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. खेळाडूच्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कोणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आपण करू, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेना हिंदू सणांना विसरली"

महाराष्ट्रातील या दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईमध्ये तर शिवसेना विरुद्ध भाजपा असा रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. "हिंदू सणांसोबत भाजपा आहे आणि शिवसेना या सणांना विसरली आहे, हे सर्वांना समजले आहे. वरळीच काय पूर्ण मुंबईत भाजपाचे कमळ फुलणार आहे. वरळीचा आमदारदेखील भाजपाच्याच मताने निवडून आला आहे. शिवसेनेने हिंदुत्वाला कधीच सोडले आहे," अशी टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या